बंगळुरून | भाजपाकडून जेडीएसच्या काही आमदारांना १०० कोटी आणि कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. सत्ता स्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा द्यावा, हा काळा पैसा येतो कुठून? आता आयकर विभागाचे अधिकारी कुठे आहेत?, असे प्रश्न कुमारस्वामी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना उपस्थित करुन मोदींवर निशाणा साधला.
JD(S) MLAs are being offered Rs 100 crore each. Where is this black money coming from? They are supposedly the servers of poor people and they are offering money today. Where are the income tax officials?: HD Kumaraswamy, JD(S) #KarnatakaElections2018 pic.twitter.com/d157SS30E5
— ANI (@ANI) May 16, 2018
भाजपने आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांचे दुप्पट आमदार फोडू. त्यांचे किमान १५ आमदार आम्ही फोडू शकतो,’ असे थेट आव्हान कुमारस्वामी यांनी दिले. कर्नाटकात निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला. यात भाजप आणि काँग्रेस यांना स्पष्ट असे बहुमत मिळाले नाही. सत्ता स्थापन करण्यासाठी ११२चा आकडा कोणत्याही पक्षाने पार केला नाही. बहुमतसाठी जेडीएसच्या पाठिंब्या शिवाय कर्नाटकात सत्ता स्थापन करणे शक्य होणार नाही. त्यासाठी भाजप पैसा आणि मंत्री पदाचे आमीष दाखवून जेडीएसला भाजपच्या बाजूने करण्यांचा प्रयत्न सुरू आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post