HW News Marathi
मुंबई

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची भारतीय मानक ब्युरोवर सदस्यपदी नियुक्ती

उत्तम बाबळे

नांदेड :- भारत सरकारच्या भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) या समितीवर ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेस सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने नुकतीच १४ सदस्यीय समिती गठित केली आहे. दोन वर्षासाठी निवड केलेल्या समितीमध्ये केंद्र शासनाचे चार अतिरिक्त सचिव, चार राज्यांचे वेगवेगळ्या मंत्रालयाचे मंत्री, सी.आय.आय., फिक्की, ॲसोचेम या संस्थांचे अध्यक्ष या सोबत ग्राहकांविषयी कार्यरत असणारी संस्था म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्रची समितीवर सदस्य म्हणून निवड केल्याचे पत्र नुकतेच भारत सरकारचे अतिरिक्त सचिव यांच्याकडून पत्र प्राप्त झाले आहे, अशी माहिती राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी सांगितले.

वेगवेगळ्या ग्राहकोपयोगी वस्तू व उत्पादने यांची मानके ठरविणे, ग्राहक हितांच्या योजना राबविणे, ग्राहकांच्या अडचणींवर मार्ग काढणे अशा अनेक आयामांवर कार्य करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे. ग्राहक संघटन, प्रबोधन व संरक्षण विषयक कार्य करणारी संस्था म्हणून भारत सरकारने ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या भारतीय मानस ब्युरो समितीवर निवड केल्याबद्दल संघटनेसाठी ही एक मोठी गौरवाची बाब असल्याचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी, प्रिंटींग प्रेसला लागली आग, एकाचा मृत्यू

swarit

श्वानांच्या विष्ठेमुळे मुंबईकर हैराण, जी उत्तर विभागाचा श्वानमालकांना दणका

News Desk

येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला

News Desk