HW News Marathi
राजकारण

विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेचा ५०-५० फॉर्मुला

मुंबई | लोकसभा निवडणुकांनंतर आता देशातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप-शिवसेना युतीच्या फॉर्म्युल्याबद्दल विधान केले आहे. “महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष प्रत्येकी १३५ जागा लढवतील तर मित्रपक्षांना १८ जागा दिल्या जातील”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मराठवाड्यातील दुष्काळी दौऱ्यावर असताना चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेसाठीच्या युतीच्या फॉर्म्युल्याबद्दल बोलताना हे स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर आता हे पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. वारंवार स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने १८ फेब्रुवारी रोजी भाजपसोबत युती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसनेच्या युतीची अधिकृत घोषणा केली आहे. लोकसभेसाठी शिवसेनेला २३ तर भाजपला २५ जागा तर विधानसभेसाठी ५०-५० जागांचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे त्यावेळी देखील सांगण्यात आले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह राजेंद्र भागवत यांना पुसद न्यायालयाने जारी केले वॉरंट

News Desk

लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला का केलं नाही? तेव्हा सरकार कोणाचं होतं?; आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

Aprna

राम नव्हे हा तर रावण । मनसे

News Desk