नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये बहुमत मिळालेले नसताना देखील सरकार स्थापन करण्याच्या भाजपच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. ट्विटमध्ये राहुल म्हणालेत, भाजपने बहुमत नसतानाही कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी प्रचंड अट्टाहास केला आहे. हा प्रकार म्हणजे संविधानाशी केलेली थट्टा आहे. भाजप आपल्या पोकळ विजयाचा उत्सव करत असताना देश मात्र लोकशाहीच्या पराभवाचा शोक व्यक्त करेल, असाही टोला राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपाला लगावला आहे.
राहुल यांनी येडियुरप्पा यांच्या शपथ विधी पुर्वी हे ट्विट केलेल आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले नसतानाही भाजपाने गुरुवारी सरकार स्थापन केले. गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्यानंतर येडियुरप्पा हे कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. परंतु भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपाला १५ दिवसांचा अवधी दिला आहे. येत्या काळात भाजप हे बहुमत सिद्ध करु शकणार का हे पहाणे येत्या काळात महत्वाचे ठरणार आहे.
The BJP’s irrational insistence that it will form a Govt. in Karnataka, even though it clearly doesn’t have the numbers, is to make a mockery of our Constitution.
This morning, while the BJP celebrates its hollow victory, India will mourn the defeat of democracy.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 17, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.