Site icon HW News Marathi

वेदांता प्रकल्पाबाबत ‘मविआ’वर होणाऱ्या टीकेवरून अजित पवारांचे प्रत्युत्तर

मुंबई | वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले”, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांनी आज (20 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन शेलारांवर निशाणा साधला.

अजित पवार म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले, आमच्यावर जे आरोप करण्यात येत आहे. आम्ही तसे काही केलेले नाही. तरुण आणि नागरिकांमध्ये उगाच संभ्रम करू नका निर्माण करू नका”, असे त्यांनी व्यक्त केले. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, “काही जण जे काही अफवा पसरवत आहे आणि चुकीच्या बातमी पसरवण्याचा प्रयत्न करतायत की यांच्याच काळात वेदांतानी ते नाकारलेला होता. ते साफ चुकीचा असून ते फक्त महाविकास आघाडी सरकारचा नाव बदनाम करण्याचा काम करत आहे.”

आशिष शेलार आणि राज ठाकरे नेमके काय म्हणाले

भाजप नेते आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुद्धा काल (19 सप्टेंबर) मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत महाविकस आघाडीवर आरोप केले होते. यावेळी शेलार म्हणाले, “या प्रकल्पासाठी महाविकस आघाडीने काही टक्केवारी मागितली होती, असा आरोप शेलारांनी केला होता. त्याचबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी देखील नागपूर दौऱ्यादरम्यान काल पत्रकार परिषदेत एक पत्रकारांनी  काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर राज ठाकरे म्हणाले, “एखाद्या प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर कसा जातो, हा प्रकल्प गुजरातला कसा गेला याची चौकशी करणे गरजेचे आहे. या उद्योजकांकडे  पैसे मागितले गेले का? असे प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला होता.

Exit mobile version