HW News Marathi
राजकारण

बोरिवलीत राष्ट्रवादीचा भाजप विरोधात गाजर वाटप करून विरोध

मुंबई | आगामी 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीची घालमेल सर्वत्र सुरू झाली आहे. सत्तेत असलेले मोदी सरकारदेखील यापूर्वीच कामाला लागलेले आहे. नेहमी ‘चाय पे चर्चे’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता आगामी निवडणुकीच्या तोंडावर थेट नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

पश्‍चिम उपनगरांत बोरिवलीत प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. त्याच ठिकाणी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी भाजपचा गाजर वाटप करून विरोध दर्शविला आहे. यावेळी पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेत बोरिवली पोलीस ठाण्यात नेले आहे.

याची सुरुवात महाराष्ट्रात प्रथमच मुंबईतील उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रातील बोरीवलीतून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधतील. गेल्या पाच वर्षांत उत्तर मुंबईतील खासदार आमदारांच्या लेखाजोखाचा आढावा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांकडूनच घेणार आहेत. तसेच मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत ज्या योजना उपलब्ध केल्या, लाभार्थ्यांना त्या मिळाल्या की नाही. त्याचा त्यांना कशाप्रकारे उपयोग झाला याची देखील माहिती घेतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RamMandir : उध्दव ठाकरेंनी घेतले प्रभू रामचंद्रांचे दर्शन

News Desk

#MeToo : एम. जे. अकबरांवर आणखी एका महिला पत्रकाराचा गंभीर आरोप

News Desk

प्रियांका चतुर्वेदी यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड

News Desk