नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी ‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी‘ची घोषणा करण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत २ हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये खात्यात जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. या योजनेचा फायदा जवळपास १२ कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना होणार आही ही योजना लागू करण्यासाठी वर्षाला ७५ हजार कोटी रुपये ऐवढा खर्च येणार आहे. हा सर्व खर्च केंद्र सरकार करणार असल्याचे गोयल यांनी सांगितले. अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज (१ फेब्रुवारी) संसदेत सादर केला.
FM Piyush Goyal: This initiative will benefit 12 crore small and marginal farmers, at an estimated cost of Rs. 75,000 crore https://t.co/TdjD4wkwAi
— ANI (@ANI) February 1, 2019
या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतपिकांना चांगला भाव मिळत नव्हता. त्यासाठी २२ शेतपिकांच्या किमान आधारभूत किंमत दीडपटीने वाढविली आहे. हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला तर त्या शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज योजनेतर्गंत २ टक्के व्याज सवलत देण्यात येणार आहे. यामुळे शतकरी वेळेत कर्जाची परतफेड करेन आणि तसे केल्यास त्यांना ३ टक्के व्याजात सवलत मिळणार असल्याचे गोयल यांनी सांगितले.
FM Piyush Goyal: Instead of rescheduling of crop loans, the farmers severely affected by natural calamities will get 2% interest subvention and additional 3% interest subvention upon timely repayment pic.twitter.com/X2mLg9KIhC
— ANI (@ANI) February 1, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.