HW News Marathi
राजकारण

“तुम्हाला देण्यासारखे माझ्याकडे काहीही नाही,” उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना भावनिक साद

मुंबई। “आता मात्र तुम्हाला देण्यासारखे माझ्याकडे काहीही नाही,” अशी भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी घातली आहे. राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बैठकीचा सपाट लावला आहे. उद्धव ठाकरेंनी आज (६ जुलै) पुण्यातील शिवसैनिकांसोबत संवाद साधला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “मी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आजपर्यंत जेव्हा देणे शक्य होते, तेव्हा दे दिले. परंतु, त्यांनी ते घेऊन त्यांचे गुण दाखविले. आता मात्र तुम्हाला देता येण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही. मला तुम्हाला हेच सांगायचे की, तुमच्या सर्वांच्या ताकदीने आपण ज्या लोकांना दिले, ते गेले. परंतु, आता माझ्यासमोर त्यांना देणारे सगळे माझ्यासोबत राहिले आहेत.”
“तुमचा जोश असाच असला पाहिजे, कारण जर पराभव पदरी पडला. तर आपण त्याचे रूपांतर विजयात करायला मन खंबीर पाहिजे. पण, त्यासोबतच भान सद्धा पाहिजे. येथून पुढे धनुष्यबाण असेल, पण तो जिंकावायचा कसा,  यासाठी तयारीला लागा. शिवसेना नुसती फोडली नाही तर शिवसेना संपवायचा डाव आहे. पण, या महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. दुसरी शिवसेना या राज्यात होऊन शकत नाही. आणि हे कायद्याने देखील शक्य नाही,” उद्धव ठाकरे म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे गटाला मोठा धक्का! शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Aprna

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटावरून राजकारण पेटले

News Desk

सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत | ठाकरे

News Desk