HW Marathi
राजकारण

ख्रिश्चियन मिशेल यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी

नवी दिल्ली | ऑगस्ता वेस्टलँड म्हणजे व्हीव्हीआयपी चॉपर घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (५ डिसेंबर) ख्रिस्तियन मिशेल यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. ऑगस्ता वेस्टलँड प्रकरणात ३६०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये संबंधित राजकीय नेत्यांशी मध्यस्थी केल्याचा आरोप ख्रिश्चियन मिशेल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दिल्लीतील पटीयाला हाऊस कोर्टाने आज(५ डिसेंबर) मिशेल यांना ५ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

दुबई कोर्टाच्या प्रत्यार्पणानंतर काल (४ डिसेंबर) संध्याकाळी यूएइने ख्रिस्तियन मिशेलला भारताच्या ताब्यात दिले. सीबीआयने रात्रीच मिशेल दिल्लीला आणले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या नेतृत्वातील पथकाने मिशेल यांना भारतात आणून न्यायालयात हजर केले. सीबीआयकडून अॅड. डीपी सिंह यांनी बाजू मांडताना मिशेल यांना सीबीआय कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यावर, न्यायालयाने परवानगी देत हा मिशेल यांना ५ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवले आहे. कोठडीत मिशेल यांच्याकडून महत्त्वपूर्ण दस्तावेज आणि माहिती काढण्याचा सीबीआयचा प्रयत्न असणार आहे.

 

Related posts

शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकला

News Desk

…तरीही उपोषण सुरू ठेवायला मी वेडा आहे का ?

News Desk

स्वराज यांच्या निर्णयावर बोलले पी चिदंमबरम

News Desk