Site icon HW News Marathi

डागळलेली प्रतिमा असलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान देणे चुकीचे! – अजित पवार

मुंबई | “ज्यांची प्रतिमा डागळलेली आहे. आणि कुठेही त्यांना क्लिन चिट मिळालेली नाही,” अशा व्यक्तींना देखील शिंदे सरकारने मंत्रिमंडळात घेतले. हे फार चुकीचे केले, असे मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाला. यात भाजपचे 9 तर शिंदे गटातील 9 एकूण 18 आमदारांनी मंत्री पदाची शपथ केली आहे. या मंत्रिमंडळात शिंदे गटाली आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून शिंदे सरकारवर भाजपच्या महिला आघाडीच्या नेता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राठोडांना ‘मंत्रीपद देणे हे दुर्दैवी आहे,’ अशी टीका व्हिडिओ ट्वीट करत केली आहे. चित्र वाघसह राज्यभरातून शिंदे सरकारवर टीका होत होती. तसेच शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळात महिलांना स्थान न देणे हा त्यांचा अपमान आहे, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, “तुम्ही शपथ विधी करतन नाही. हे महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून ही अतिशय कमीपणाची बाब आहे. नंतर शिंदे सरकारनी शपथ विधी केला. परंतु, महाराष्ट्रातील जनता ही फक्त बघत असते की कोण काय करते. शिंदे सरकारने शपथविधी घेत असताना, ज्यांची प्रतिमा डागळलेली आहे. आणि कुठेही त्यांना क्लिन चिट मिळालेली नाही, अशा व्यक्तींना देखील त्यांनी मंत्रिमंडळात घेतले. हे फार चुकीचे केले हे आमचे स्पष्ट मत आहे. आर्थात हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, हे जरी खरे असले तरी हे सरकार शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सरकार आहे. आता भाजपने  यामध्ये बाबा ज्यांच्याबरोबर ते गेलेले आहेत. शिंदे सरकारमध्ये मंत्रिमंडळात घेत असताना. आम्ही सरकारमध्ये असताना ज्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस एवढे आरोप केले होते. आणि ऐवढे पुरावे देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि ते देवेंद्र फडणवीस मात्र मंत्रिमंडळात घेत असताना शांतपणे बसतात. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे.”

मंत्रिमंडळात महिलांना स्थान नसणे त्यांचा अपमान

दुसरी गोष्ट म्हणजे आपण नेहमीच महिलांना प्राधान्य देत असतो. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने आपण मंत्रिमंडळात संधी दिली पाहिजे, असे आपण म्हणत असतो. आणि असे असताना. आज तरी भाजपचे जेवढे आमदार काम करतात. त्यात सर्वात जास्त महिला आमदार या भाजपच्या निवडून आलेल्या आहेत. भाजपच्या महिला जास्त असताना देखील मंत्रिमंडळात एकाही महिलेला घेत नाहीत. एवढेच नव्हे तर शिंदे गटामध्ये ही महिला निश्चितपणे होत्या. आम्ही शिंदे गटात दिसत होत्या. परंतु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बाजूने एकही महिलांना स्थान दिले नाही. हा सरळ सरळ महिला बगिनींचा अपमान आहे. ही बाबा खटकणारी, अशा प्रकारची शिंदे सरकारने मंत्रिमंडळाचा करत असताना केलेली आहे.

 

Exit mobile version