नवी दिल्ली | “चहावाल्या, आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करू नका. चहा-चहा ओरडता, लक्षात ठेवा एवढं बोलेन की तुमच्या कानातून रक्त येईल”, असे अत्यंत टोकाचे आणि वादग्रस्त विधान अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींबाबत केले आहे. त्यामुळे, तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचारात वापरण्यात येणाऱ्या भाषेची पातळी घसरत चालल्याचे चित्र दिसत आहे. हैदराबादमधील चारमिनार विधानसभा मतदारसंघातील रॅलीच्या वेळी अकबरुद्दीन ओवेसी बोलत होते.
#WATCH Akbaruddin Owaisi, AIMIM in Hyderabad: Baat karein ki ‘chai chai chai, chai. Har waqt vahi, demonetisation. Ye chai, vo chai, kadak chai, naram chai. Ye Wazir-e-Azam hain ya kya hain? Arey chaiwala tha, ab Wazir-e-Azam hai. Wazir-e-Azam jaisa ban jao. (02.12.2018) pic.twitter.com/t4xA1S103j
— ANI (@ANI) December 3, 2018
अकबरुद्दीन ओवेसी यांनी यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत देखील असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ”आज आणखी एक जण आला आहे. तो असे कपडे घालतो कि एखाद्या तमाशासारखा दिसतो. नशिबानं मुख्यमंत्री झाला आहे. तो म्हणतो, निजामाप्रमाणे ओवेसीला पळवेन. अरे तुझी लायकी काय आहे ? अरे ओवेसीला सोड, त्याच्या पुढे येणाऱ्या १०० जातीदेखील या देशात राहतील आणि तुमच्या विरोधात लढतील”, अशा भाषेत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर देखील टीका केली आहे.
Asaduddin Owaisi in Malakpet, Hyderabad: Inke UP CM Hyderabad mein tapak gaye. Bechare UP CM keh rahe hain ki agar Telangana mein BJP ki govt banegi to Owaisi ko bhaga denge, jis tarah Nizam ko bhagaye theyy. Main inko pooch raha hoon, ye bhagana ki baat tum kab se kar rahe ho? pic.twitter.com/2wr6FpKYai
— ANI (@ANI) December 2, 2018
असदद्दुीन ओवेसी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात देखील सध्या वाद सुरु आहे.भाजप सत्तेत आल्यास ओवेसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पाळावे लागले, असे विधान योगी आदित्यनाथ यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर असदुद्दीन ओवेसींनी योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले आहे. ” हिंदुस्थान मेरे अब्बा का है, मै नही जाऊंगा”, असे म्हणत ओवेसींनी योगींना प्रत्युत्तर दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.