HW Marathi
राजकारण

चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र नारा लोकेश नजरकैदेत, टीडीपी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

आंध्र प्रदेश | आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र माजी राज्यमंत्री नारा लोकेश यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशात टीडीपीच्या नेत्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या निषेधार्थ आणि राज्यातील वायएसआर काँग्रेस सरकारच्या विरोधात ए. चंद्राबाबू नायडू यांनी आज (११ सप्टेंबर) सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत ‘चलो आत्मकूर’ आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर टीडीपीचे कार्यकर्ते ए. चंद्राबाबू नायडू यांच्या घराकडे जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.’चलो आत्मकूर’ आंदोलनात सहभागी होणाऱ्या कृष्णा जिल्ह्यातील नंदिगामामध्ये डीटीपीचे माजी आमदार तंगिराला सौम्या यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, विजयवाडा येथून माजी मंत्री आणि डीडीपी नेते भुमा अखिला प्रिया यांना सुद्धा पोलिसांनी नोवोटेल हॉलेटमध्ये नजरकैद केले आहे.

Related posts

या नेत्यांना पंढरपुरची महापूजा करता आली नाही

#RamMandir : विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राम मंदिरासाठी कायदा करण्यास अडचण !

News Desk

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिव्यांग मतदारांसाठी वाहन सुविधा

News Desk