HW News Marathi
राजकारण

चंद्रकांत खैरे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे !

औरंगाबाद | लोकसभा निवडणुकांचा महाराष्ट्रातील टप्पा जरी पार पडला असला तरीही राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. औरंगाबादमधील शिवसेनेचे खासदार आणि लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर ‘युती धर्म सोडून जावई धर्म निभावला’, अशी टीका केली होती. रावसाहेब दानवे यांचे जावई आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

“चंद्रकांत खैरे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांचे वय झाल्यामुळे त्यांना आता चेकअपची गरज आहे. पराभवाच्या भीतीच्या छायेखाली येऊन ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत”, असा प्रत्यारोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी यासंदर्भात बोलताना चंद्रकांत खैरे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना खरं तर आत्ता चांगल्या ट्रीटमेंटची गरज आहे, असेसुद्धा म्हटले आहे.

रावसाहेब दानवे यांनी मला ५० लाखांची मदत केली, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. हा आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा. त्यांनी जर हा आरोप सिद्ध केला तर मी पाहिजे ते करायला तयार आहे, असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मला माझ्या सासूबाईंनी मदत केली सासर्‍यांनी मदत केली, असे म्हणण्यापेक्षा मी माझ्या वडिलांच्या नावावर त्याचबरोबर माझ्या कर्तृत्त्वावर इथपर्यंत पोहोचलो आहे, असेसुद्धा त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्याच्यामुळे चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील हा वाद शिगेला पेटला आहे. त्यामुळे येणाया लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद मतदारसंघात काय निकाल लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोशल मीडियावर जाहीरातींवर राजकीय पक्षांनी खर्च केले तब्बल ५३ कोटी रुपये

News Desk

अयोध्येतील त्या जागेवर राम मंदिरच होते | मोहन भागवत

News Desk

सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा! – नितेश राणे

Aprna