मुंबई | राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज (३१ जुलै) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. “महिला नेतृत्व आमच्याकडे आले आहे, तर आता राष्ट्रवादीत काहीच उरले नाही,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रा वाघ यांच्या प्रवेशानंतर संबोधित करताना म्हणाले आहे. मुंबईतील गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आणि विनोद तावडे आदींसह भाजप नेत्यांच्या उपस्थित चित्रा वाघ यांनी प्रवेश केला आहे.
Mumbai: Former NCP leaders Shivendra Raje Bhosale, Sandeep Naik & Chitra Wagh join Bharatiya Janta Party in presence of Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis. pic.twitter.com/OqSZM9g4rG
— ANI (@ANI) July 31, 2019
चित्रा वाघ यांच्या भाजप प्रवेशाने आता आणखी एका वाघाच्या संख्येत वाढ झाली असून. तर आता ता काही पक्षांचे तीन तेरा वाजवण्याचे काम चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली होईल असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. भाजपमध्ये चित्रा वाघ यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.