HW News Marathi
राजकारण

युतीच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री ‘मातोश्री’वर दाखल

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज (१४ फेब्रुवारी) युतीची चर्चा करण्यासाठी मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले आहेत. शिवसेनेबरोबरचा युतीचा निर्णय आज घ्या, असा आदेश अमित शहांनी महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वाला दिला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांसह भाजपाचे वरिष्ठ नेते मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

येत्या ४८ तासांत युतीचा अंतिम निर्णय द्या, अन्यथा आम्ही आमच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात करू असे अल्टिमेटम शिवसेनेने भाजपाला दिल्याची माहिती सूंत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजपामधील युतीच्या होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लोकसभा निवडणूक जस जशी जवळत येत आहे. तसे राजकीय घडामोडींना वेग येत असल्याचे दिसत आहे.

युतीसाठी शिवसेनेकडून तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत. पहिली अट पालघरची जागा शिवसेनेला द्यावी तसेच लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागांचेही वाटप व्हावे, दुसरी अट शिवसेनेला हवा असलेला एखादा मोठा धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावा (उदा. नाणार) आणि तिसरी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापैकी एकाने मातोश्रीवर येऊन शिवसेनेची मनधरणी करावी, या अटींचा समावेश आहे.

“एनडीएने २०१९ मध्ये सत्ता स्थापन केल्यास त्यामध्ये शिवसेना, अकाली दल आणि एनडीएतील मित्रपक्षांची महत्त्वाची भूमिका असेल. एनडीएतील मित्रपक्षांची आपापल्या राज्यातील स्थिती अत्यंत भक्कम आहे. त्यामुळे जर भाजपला केंद्रात त्यांच्या मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी त्या त्या मित्रपक्षांना मंत्रिपद द्यावे”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप २५, तर शिवसेना २३ लढवेल तर विधानसभा निवडणुकीत भाजप १४५, तर शिवसेना १४३ जागा लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु यापूर्वी शिवसेनेकडून आगामी निवडणुकांच्या जागावाटपासाठी १९९५चा फॉर्म्युला वापरण्याची मागणी करण्यात येत होती. शिवसेनेने १९९५ मध्ये विधानसभेच्या १७१ आणि भाजपने ११७ जागा लढवल्या होत्या. त्यावेळी राज्यात १३८ जागा जिंकून युतीचे पहिले सरकार स्थापन झाले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याचा ठराव संमत; पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी

Aprna

इतरांच्या खुर्च्यांना टेकू देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही !

Gauri Tilekar

आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशनवर बघितलं होतं !

News Desk