कल्याण | नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सोयीस्कर प्रवास होण्यासाठी आज (१८ डिसेंबर) कल्याण-भिवंडी-ठाणे आणि दहिसर-मीरा रोड-भाईंदर जोडणाऱ्या मेट्रो ५ आणि मेट्रो ९ च्या मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजना वेळी दहिसर-मीरा रोड-भाईंदर मेट्रोला नेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Kalyan: PM Narendra Modi lays foundation stone of two metro corridors — Thane-Bhiwandi-Kalyan Metro&Dahisar-Mira-Bhayander Metro and CIDCO housing scheme in Maharashtra. pic.twitter.com/x551SdwOj0
— ANI (@ANI) December 18, 2018
मुंबईचा विस्तार वाढल्यानंतर मुंबईतला मराठी माणूस ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये विसावला आहे. त्यामुळे भिवंडीसारख्या कुठल्याही कनेक्टिव्हिटी नसलेल्या भागाला मेट्रोने जोडत आहोत.’ असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, राज्यपाल विद्यासागर राव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
At the foundation stone laying ceremony of Mumbai Metro 5 & 9 & ground breaking ceremony of 90,000 houses by Hon PM @narendramodi ji. Watch live https://t.co/fuMX1CDfYD
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 18, 2018
यावेळी मुख्यमंत्री बोलत होते की, लवकरच कल्याणवासियांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गामुळे भिवंडी आता मुंबईशी जोडली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम कमी वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे येत्या पाच वर्षांत एक कोटी प्रवाशांची सोय होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
तसेच उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पाला दहिसर-मीरा रोड मेट्रोला वसई मेट्रो मार्गाने जोडण्यात यावे. यासंदर्भात रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर दहिसर-मीरा रोड मेट्रोला वसई मेट्रो मार्ग लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी, दहिसर-मीरा रोड मेट्रोला वसई नवीन मेट्रो मार्गांचे लवकरच डीपीआर तयार करून त्याला तातडीने मंजुरी दिली जाणार, असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.