HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी RSSचे मुख्यालय आणि दीक्षाभूमीला दिली भेट

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या मुख्यालयात दाखल झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील रेशीमबाद आरएसएसच्या (RSS) मुख्यालयात आज (29 डिसेंबर) सकाळी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून आरएसएसचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. विधिमंडळाच्या आजच्या अधिवेशनात आरएसएस मुख्यालयाच्या भेटीसंदर्भात विरोधक प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरू आहे. हिवाळी अधिवेसनादरम्यान भाजपचे आमदार हे आरएसएसच्या मुख्यालयाला भेट देतात.  भाजपच्या आमदारांनी 27 डिसेंबरला आरएसएसच्या मुख्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी मुख्यालयाला भेट दिली परंतु, शिंदे गटाच्या एकाही नेत्यांनी भेट दिली नसल्याचे माध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी 27 डिसेंबरला फक्त भाजपचे आमदार येणार होते,  असे भाजपने स्पष्टीकरण दिले. यानंतर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आरएसएसच्या मुख्यालयात भेटीसाठी आले.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरएसएसच्या मुख्यालयाला भेट दिली. यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दीक्षाभूमीला देखील भेट दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकाच दिवशी आरएसएसच्या मुख्यालय आणि दीक्षाभूमीला भेट दिली. यामुळे सर्वांच्या भुवण्या उंचविल्या.

आता तीर्थक्षेत्रचा ‘अ’ दर्जा दिला

फडणवीस सरकारच्या काळात दिक्षा भूमीला ‘अ’ दर्जा दिला. आणि शिंदे सरकारने देखील दिक्षा भूमील ‘अ’ दर्जा दिला, यात ऐवढी तफावत का?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, “यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, याची माहिती माझ्याकडे आहे. मला विचारा,असे उपमुख्यमंत्री म्हणाले, “पहिल्यांदा आपण जो दर्जा दिला होता. तो पर्यटनाचा दिला होता. आणि आता तीर्थक्षेत्रचा अ दर्जा दिला आहे. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा आपण जेव्हा समितीसोबत चर्चा केली होती. तेव्हा मागणी होती की, पर्यटनाचा अ दर्जा दिला पाहिजे. यानंतर सर्वांना असे वाटले की, तीर्थक्षेत्रचाही अ दर्जाची मागणी झाली होती. यामुळे आता दिर्थक्षेत्राचा अ दर्जा दिलेला आहे.

 

Related posts

प्रयागराजमध्ये सर्व भाविक अक्षयवट आणि सरस्वती स्तंभाचे दर्शन करू शकणार !

News Desk

दाऊदसाठी आता भीक मागितली जाते मात्र शरद पवारांनी ती संधी गमावली !

News Desk

‘सपा’ची पहिली यादी जाहीर, मुलायम सिंग ‘मैनपुरी’ मतदारसंघातून लढणार

News Desk