HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांना दादाची ट्यूशन लावावी लागेल- राष्ट्रवादी कॉँग्रेसचा मुख्यमंत्र्यावर हल्ला

मुंबईः राज्यातील भाजप सरकारवर राष्ट्रवादीने ट्विटद्वारे जोरदार हल्ला चढवला आहे. या सरकारकडे कोणताही प्रश्न घेऊन गेल्यास, एकच उत्तर मिळते. ते म्हणजे अभ्यास सुरू आहे. तीन वर्ष झाली पण मुख्यमंत्र्यांचा अभ्यास चालूच आहे. बहुतेक त्यांना दादाची ट्युशन लावावी लागेल म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अभ्यास लवकर होईल, असा टोळा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून टिवटरद्वारे लगावला आहे. सुप्रिया सुळेंच्या ट्विटरला राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी उचलून धरले असून केंद्र राज्य सरकारच्या फसव्या घोषणांची यादीच जारी केली आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेची जाहिरताबाजी करतात. परंतु राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी या योजनेतील घोटाळा चव्हाट्यावर आणला आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनीही ही योजना पूर्णपणे राबवण्यात अपयश आल्याची कबुली दिली आहे. हे वाघ व पक्षाचे यश असल्याचे सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे आज अहमदनगर जिल्ह्यात असून त्यांनी येथील अनेक घटनांना उजाळा देत सरकारच्या खोट्या आश्वासनावर टीका केली. कोपर्डी घटनेचा त्यांनी उल्लेख केला. आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही आग्रही होतो, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्भया फंडाचे केवळ सहाशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. इतर 1400 कोटी कुठे गेले, असा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला.

सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला, यावर त्यांनी टीका केली. मराठी शाळांमध्ये बहुजन समाज, शेतकरी, शेतमजुरांची मुले जातात, सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊन या समाजाच्या पुढच्या पिढीचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतला जावू शकतो. त्यामुळे सरकारने एकही शाळा बंद केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : अखेर ‘संयुक्त पुरोगामी महाआघाडी’ची अधिकृत घोषणा

News Desk

गुजरातसाठी भाजपच्या ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश

Darrell Miranda

नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतला भाजप सरकारचा समाचार

Gauri Tilekar