HW News Marathi
राजकारण

“मला पाठविलेली नोटीस जशी केली, तसे…”, चित्रा वाघांचे महिला आयोगाला आव्हान

मुंबई | “मला पाठविलेली नोटीस जशी जाहीर करण्यात आली, तसे पाठविलेले उत्तर जाहीर करा”, असे आव्हान चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महिला आयोगाला (Commission for Women) केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री उर्फी जावेदवरुन (Uorfi Javed ) राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून राज्यात भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वाद चिघळला आहे. महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठविली होती. यानंतर चित्रा वाघ यांनी आज (8 जानेवारी) सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन रुपाली चाकणकर यांच्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ महिला आयोगाने पाठविलेल्या नोटीसवर बोलताना म्हणाल्या, “जर त्यांना थोडे कष्ट करू देना, मी तर आहेच. मी जे उत्तर दिले आहे, ते मी तुम्हाला देणारच आहेत. महिला आयोगाने ज्या पद्धतीने लगेच नोटीस पाठविली. तुमच्यापर्यंत त्या नोटीस आल्या तसे त्यांनी माझे उत्तर ही त्यावे, असे माझे आव्हान आहे. नाही तर मी तुमला देणारच आहे. याबद्दल काही वाद नाही.” पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, “मला अशा 56 नोटीस रोज येत असतात, यात अजून एक आली. त्या विशेष असे काही नाही. आणि त्याचे उत्तर मी दिलेले आहे. कारण सन्मान आयोगाचा आहे. व्यक्ती जरी चुकीची बसलेली असली, तर जो आयोग आहे. तो सन्मान आहे त्याचा आणि त्या आयोगाला त्या ठिकाणी मला जी नोटीस पाठविली, त्याचे उत्तर मी त्या ठिकाणी दिलेले आहे,” असे त्या म्हणाल्यात.

रुपाली चाकणकरांचे कान टोला आमचे नाही

सुप्रियाताईंनी लक्ष्यात घेतले पाहिजे, या ज्या अध्यक्षा त्यांनी बसविलेल्या आहेत. त्यांना आम्ही गुळ खोबरे देऊन आमंत्रण दिले नव्हते. आणि हे सुप्रिया ताईना मान्य आहे का?, मुंबईच्या रस्त्यावरी चालला नांगानाच हा त्यांना मान्य आहे का?, त्यांच्या घरात मुली आहेत, आमच्याही घरात मुली आहेत. आमच्या घरातील आणि त्यांच्या घरातील मुलींना त्यांना हा आदर्श अपेक्षित आहे का? तर हे कान तुम्ही तुमच्या बाईचे टोचा आमचे नाही. आमची भूमिका पटत नसेल तर सांगा. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?, असा सवाल चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना सवाल केला आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींच्या ‘या’ विधानामुळे पुन्हा उडाला नेटिझन्सचा गोंधळ

News Desk

Sharad Pawar ED Case | पवारांसाठी बारामतीनंतर आज ‘परभणी बंद’

News Desk

मी कधीच पत्रकार परिषदांना घाबरलो नाही !

News Desk