HW Marathi
राजकारण

चौकीदार चौर नही चौकन्ना है | पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | “चौकीदार चौर नही चौकन्ना है”, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. राहुल गांधी हे वारंवार पंतप्रधान मोदींविरोधात “चौकीदार चोर है”चे नारे लगावत असतात. शनिवारी झालेल्या सभेत देखील राहुल गांधी यांनी याचा पुनरुच्चार केला होता. “सर्व चौकीदार चोर नाहीत, मात्र देशाचा चौकीदार चोर आहे”, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले होते. “काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैन्याचे खच्चीकरण का करत आहेत ? ज्या विधानांमुळे शत्रूला फायदा होईल अशी विधाने विरोधकांकडून का केली जात आहेत ?” असा सवालही पंतप्रधान मोदींनी केला आहे.

राहुल गांधींच्या या विधानाला पंतप्रधान मोदींनी आज प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी हे बिहारमधील पटना येथील गांधी मैदानात आयोजित सभेत बोलत होते. “चौकीदार चोर नही चौकन्ना है” असे म्हणत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. चौकीदारामुळे देशाला लुटणारे हैराण आहेत, असा टोला देखील यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लगावला आहे. नवा भारत आपल्या वीर जवानांच्या बलिदानानंतर गप्प बसत नाही उलट त्याचा ‘चुन चुन के बदला लेता है” असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Related posts

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विधिमंडळाचे कामकाज तहकूब

News Desk

…त्या दिवशी पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल !

Gauri Tilekar

मनोहर पर्रीकर यांच्यावर आज संध्याकाळी पणजीमध्ये होणार अंत्यसंस्कार

News Desk