HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

‘आधे इधर आधे उधर, बाकी मेरे पीछे आओ’ अशी राज ठाकरेंची सध्याची अवस्था !

मुंबई | “सध्या राज ठाकरेंची अवस्था ‘आधे इधर आधे उधर, बाकी मेरे पीछे आओ”, अशी झाली असल्याचे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मनसेची अवस्था सर्वांनाच माहित आहे. मनसेची अवस्था ही ‘उनसे’ म्हणजे ‘उमेदवार नसलेली सेना’ अशी झाली आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

“लग्न दुसऱ्याचे असताना राज ठाकरे स्वतः नाचत आहेत”, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. “राज ठाकरे यांना निवडणूक लढवायची नसल्याने, त्यांना कुणालाच काही पुरावा द्यायचा नसल्याने ते काहीही बोलत आहेत. राज ठाकरे यांनी माझा उल्लेख ‘बसवलेले मुख्यमंत्री’ असा केला. त्यांनी हे लक्षात घ्यावे कि जनतेने मला मुख्यमंत्रीपदावर आणि त्यांना घरी बसविले आहे”, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Related posts

जयकुमार रावलच्या पदाचा राजीनाम्याची मागणी – नबाव मलिक

News Desk

‘व्हॅलेंटाईन डे’ला राहुल गांधींना मिळाले ‘असे’ प्रेमाचे गिफ्ट

News Desk

गोपाळ शेट्टी राजीनामा देणार का ?

News Desk