HW News Marathi
राजकारण

“अराजकतेची ठिणगी पडली तर महाराष्ट्रात वनवा पेटेल”, संजय राऊतांची सरकारवर टीका

मुंबई | “अराजकतेची ठिणगी पडली तर महाराष्ट्रात वनवा पेटेल”, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर केली आहे. राज्यात शेतकऱ्यांचे लाँग मार्च (Farmers Long March) हा ठाणे जिल्ह्यात आला आहे.  शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या काही दिवसात मुंबईमध्ये धडकणार आहे. तसेच महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही तर मख्खमंत्री आहे, असा टोला संजय राऊतांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज (17 मार्च) माध्यमांशी बोलताना लगावला आहे.

शेतकऱ्यांचा लाँग मार्च मोर्चा हा मुंबईच्या दिशेने येऊन ठेपलेला आहे, पत्रकारांच्या या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “सरकार म्हणजे कोण परत तो प्रश्न आहेच ना इथे, या राज्यात सरकारच अस्थित्वात नाही. म्हणून तर गदारोळ आणि अराजकता माजली आहे. लाल वादळ येऊन ठेपले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून ते बाहेर पडले आहे. तुम्ही त्यांना किती काळ रोखणार आहात. इथे अराजकतेची ठिणगी पडली तर महाराष्ट्रात वनवा पेटेल. तर हे माहिती आहे का? दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्य करत आहेत. महाराष्ट्र लुटायला निघाले आहेत. महाराष्ट्र खत्म करायला निघाले आहेत. हे आम्ही सहन करणार नाही. महाविकास आघाडीने ठरविले की यावर राण उठवायचे. महाविकास आघाडीची एकत्र सभा होती. तर उद्धव ठाकरेंच्या स्वतंत्र सभा या शिवसेनेच्या माध्यमातून होतील. 26 मार्चला मालेगावला सभा आहे. मी त्यासाठी चाचलोल आहे.”

मुख्यमंत्री असता तर राज्याची अवस्था नसते

“महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही. या राज्याला मख्खमंत्री आहे. मख्खपणे सगळे चाललेले आहे. मुख्यमंत्री असता तर राज्याची अवस्था नसते. मुख्यमंत्री आणि मख्खमंत्री यात फरक आहे. सगळी सूत्रेजी आहेत ती उपमुख्यमंत्र्यांकडे आहे. मुख्यमंत्री हे 40 खोक्केबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचे काम करत आहेत. बाकी काही करत नाहीत”, असे संजय राऊत म्हणाले. तुम्ही शेतकऱ्यांशी भेट घेणार आहात, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “होय, नक्कीच.”

 

 

Related posts

सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

शिंदे गटाने गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमधील मुक्काम हलविला; गोव्याच्या दिशेने रवाना

Aprna

राज ठाकरे साधणार उत्तर भारतीयांशी संवाद

News Desk