May 24, 2019
HW Marathi
राजकारण

मराठा आरक्षणाविरोधात कॉंग्रेसचा डाव !

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी कॉंग्रेस डाव रचत आहे असा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. आधीमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसीमध्ये मराठा समाजाचा स्वतंत्र प्रवर्ग तयार करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. तर आज मागास वर्ग आयोगाचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवावा, अशी मागणी केली आहे. या दोन्ही मागण्या विसंगत आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण करण्यचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसचा हा डाव असल्याचेही तावडे यांनी म्हटलं आहे.

कॉंग्रेसवर आरोप करत तावडे यांनी सांगितले की, मराठा अहवाल पटलावर ठेवण्याची मागणी करतानाच या अहवालाची चिरफाड करून वकिलांची फौज तयार करायची व मराठा समाजाला न्यायालयात आरक्षणासाठी अडचण निर्माण करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. त्यामुळे आरक्षण देण्यापूर्वीच न्यायालयात जा आणि मराठा समाजाला मिळणार आरक्षण हाणून पाडा, असे निर्देशच केंद्रातील हायकमांडने राज्यातील काँग्रेसला दिले असावेत. मराठा आरक्षणाचा फायदा भाजपला मिळू नये यासाठीच काँग्रेस हायकमांडची ही खेळी आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केलं.

Related posts

पालघरमध्ये पैशांचा बाजार

News Desk

#LokSabhaElections2019 : आज जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवार यादी ? 

News Desk

पुलवामा हल्ल्याबाबत यादव यांचे वक्तव्य हे गलिच्छ राजकारणाचे उदाहरण !

News Desk