HW News Marathi
राजकारण

BharatBandh | अंधेरी रेल्वे स्थानकात काँग्रेसकडून रेल रोको आंदोलन

मुंबई । काँग्रेसच्या वतीने आज (१० सप्टेंबर) रोजी भारत बंदची हाक दिली आहे. पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस यात सतत होणा-या दरवाढीमुळे सर्वसामान्य त्रास सहन करावा लागत आहे. या इंधन दरवाढीचा विषेश बंद पुकारला.

पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस यात सतत होणा-या वाढी विरोधात भारत बंद पुकारला होता. हे आंदोलन सकाळी ९.३०च्या सुमारास सुरू झाले.

https://www.facebook.com/hwmarathi/videos/286165178654725/

 

अंधेरी रेल्वे स्थानकात रेल रोको

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पोलिसांनी स्टेशनवरुनच ताब्यात घेतले आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानकातील प्लाटफॉर्म क्र. ३ वर रेले रोक केला. त्यामुळे अंधेरी रेल्वे स्थानकात गोंधळ निर्माण झाला असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी चर्चगेटला जाणारी ९.५३ची लोकल रोख केली. रेल्वे स्थानकात काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सोम्य लाठीचार्च करुन परिस्थिती हाता बाहेर जाण्याआधी त्यावर नियंत्रण मिळविले. संजय निरुपम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

स्टेशन परिसरात कार्यकर्त्यांच्या घोषणा

मोदी तेरे राज मैं, कटोरा आया हात मैं, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी हैं, काहा गये भाई काहा गये अच्छे दिन काहा गये, लुटलिया भाई लुटलिया बजेपीवालोने लुटलिया अशा घोषणा देऊन भाजप विरोधात काँग्रेस सरकार निषेध व्यक्त केला.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

अंधेरी स्टेशनजळील आगरकर चौकात आंदोलन करणार होते. परंतु स्टेशनवरच आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनात कोणताही अनुचितप्रकार घडू नये. यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपुर्ण अंधेरी स्टेशनला छावणीचे स्वरुप आले होते.

काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्व कार्यकर्त्यांना भारत बंदची घोषणा करताना शांततेच्या मार्गाने करण्याचे आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानकात रेले रोको, पोलिसांना धक्काबुक्की करत आक्रमक पवित्रा घेतल्याले चित्र दिसून आले.

बेस्टच्या जादा बस

मुंबईकर ऑफिसला जाता कोणताही अडथळा आणि वाहतुकीची कोडी होऊ नये. यासाठी परिवहन मंडळाकडून (बेस्ट)जादा बस सोडण्यात आले आहे. वाहतुकीवर नियंत्रण करण्यासाठी वाहतुक पोलीस सज्ज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा आज होणार ?

News Desk

…तर मग फडणवीसांनी शिवसेनेत प्रवेश करावा !

News Desk

२०११ पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा !

Gauri Tilekar