HW News Marathi
राजकारण

महाराजांच्या जगदंब तलवार परत आणण्याच्या मुद्द्यावरून विरोधक-सत्ताधारी आमनेसामने

मुंबई | तलवारीने राज्यातील युवकांचे रोजगार परत येतील का? शिंदे फडणवीस सरकारच्या काळात इतर राज्यात गेलेले महाराष्ट्रातील उद्योग कोण परत आणणार ? असा सवाल काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला. “ब्रिटनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची (chhatrapati shivaji maharaj) जगदंबा तलवार (Jagdamba Talwar) परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत,” अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी (10 नोव्हेंबर) दिली. यानंतर वडेट्टीवारांनी आज (11 नोव्हेंबर) महाराजांची तलवारीने राज्यातील युवकांना रोजगार येतील का?, असा सवाल उपस्थित करत शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली.

वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, “रोजगार तर राज्य सरकार देतच आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात काँग्रेसची भूमिका नेहमीच अशी आक्षेप घेणारी राहिली आहे.” तसेच मुनगंटीवारांनी गुरुवारी म्हणाले, “महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पतर यावी. यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करणार आहोत. ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक झाल्यानंतर आता केंद्र सरकार जगदंब तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला 2024 मध्ये 350 वर्षे पूर्ण होईल. यासाठी आम्ही राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आम्ही एक आराखडा तयार करण्यात येत असून जर महाराजांची जगदंबा तलवार भारतात परत आली. तर आमचा आनंद मिळेल.”

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

मुनगंटीवार टीका करताना वडेट्टीवार म्हणाले, “राज्याचे सांस्कृतिक मंत्री जगदंबा तलवार आण्याचे घोषणा करत आहेत, मला आनंद आहे जे २१ वर्षात जमले नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार आण्याची भूमिका याचे आम्ही स्वागत करतो. परंतु, महाराष्ट्र बाहेर उद्योग जाऊन हजारो बेरोजगारांच्या हाताचा काम गेला आहे. महाराष्ट्राचा प्रचंड नुकसान झालाय किमान ते तलवारी बरोबर उद्योग आणले तर तलवार ही अस्मिता महाराष्ट्राची महाराजांच्या हाती असलेली वापरलेली तलवार ही आणत असताना महाराष्ट्रातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे हेही तेवढच महत्वाचा आहे. परंतु उद्योग गेले रोजगार बुडाला महाराष्ट्राचा प्रचंड नुकसान झाले आणि तो विषय बाजूला ठेवून केवळ भावनांशी खेळून तुम्ही राजकारण करतायत. हे आता महाराष्ट्राच्या तरुणांना कळते म्हणून आता तलवारी बरोबर उद्योग धंदे देखील परत आणावे म्हणजे खरी किमया, ताकद, शक्ती, आणि तुमच्या बोलण्यावर लोके विश्वास ठेवतील. पण, केवळ गुमरा करण्यासाठी लोकांना, तरुणांना दिशाभूल करण्यासाठी तलवार आण्याची भाषा करू नये तर तलवारीसोबत रोजगारीही आला पाहिजे ही भाषा सत्ताधाऱ्यानी करावी”, असे वडेट्टीवार म्हणाले.

 वडेट्टीवारांच्या टीकेला मुनगंटीवार प्रत्युत्तर देत म्हणाले

वडेट्टीवारांच्या टीकेला मुनगंटीवार प्रत्युत्तर देत म्हणाले, “रोजगार तर राज्य सरकार देतच आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात काँग्रेसची भूमिका नेहमीच, अशी आक्षेप घेणारी राहिली आहे. २०२४ मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहे. रायगडावर पुन्हा एकदा आपल्याला तो आनंद उत्सव स्वराज्याचा साजरा करायचा आहे. म्हणून ती जगदंब तलवार भारतात आणायची आहे. पण, काँग्रेसच्या लोकांचे मती ही नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज असती, स्वातंत्रवीर सावरकर असतील देशाचे मन बिंधू असतील, अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू राम हे काल्पनिक कथा आहेत, असे सांगणारे काँग्रेसची भूमिका आहे. आणि म्हणून मला असे व्यक्तिगत रित्यानी वाटते त्यांची भूमिका काँग्रेसला अनुकूल आहे. ७५ हजार रोजगार हा दिला जातोय आता मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात काम करत आहे. रोजगार देणारे जे विभाग आहेत ते रोजगार देतील आणि तलवार आणणारा जो विभाग आहे तो तलवार आणेल आणि हे समजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम हवे” असं पलटवार यावेळी त्यांनी केला.

संबंधित बातम्या

“शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू”, सुधीर मुनगंटीवारांची माहिती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे विधानसभा निवडणूक लढविणार, पहिली प्रचार सभा ५ ऑक्टोबरला

News Desk

‘त्या’ वक्तव्यासाठी साध्वी प्रज्ञा यांना कधीही मनापासून माफ करू शकणार नाही !

News Desk

१९८४ च्या शीखविरोधी दंगलीविषयी केलेल्या विधानाबाबत पित्रोदा यांनी माफी मागावी !

News Desk