HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसकडून संजय निरुपम यांना उमदेवारी, मिलिंद देवरा नवे मुंबई अध्यक्ष

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. निरुपम यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या जागी  माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरांकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत हि माहिती दिली आहे.

उत्तर मुंबईतून २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी निरुपम यांचा दारुन पराभव केला होता. शेट्टी यांचा मतदारसंघातील प्रभाव पाहता त्यांच्या विरोधात उमेदवारी नको, त्याऐवजी उत्तर-पश्‍चिम मुंबईतून उमेदवारी देण्याचा आग्रह निरुपम यांनी धरला होता.

मुंबई अध्यक्ष म्हणून निरुपम यांनी मनमानी कारभारामुळे काँग्रेसेचे अनेक दिग्गज नेते नाराज होते. त्या विरोधकांपैकी गुरुदास कामत आणि मिलिंद देवरा यांनी आक्रमक भूमिका पवित्रा घेतला होता. निरुपम यांना येथून तिकीट देऊ नये, अशी भूमिका माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी घेतली होती. परंतु काँग्रेसकडून सुवर्णमध्य काढत मिलिंद देवरांकडेची मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद दिले आहे.

 

 

 

Related posts

शिवसेना – भाजप युती तुटणार ही केवळ अफवा ?

News Desk

मागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव !

News Desk

ममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन मागे

News Desk