HW News Marathi
राजकारण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील आघाडीच्या जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची दिल्लीत आज (१३ फेब्रुवारी) महत्वाची बैठक सुरू आहे. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दुपारी सुरू झाली आहे. या बैठकीला पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे उपस्थित आहेत.

ही बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. काही जागांवर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यावर बैठकीत चर्चा सुरू असल्याचे समजते. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अनुकूल वातावरण असल्याच्या माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या दोन्ही पक्षाला आपल्याच वाट्याला याव्यात, यासाठी दोन्ही पक्षांनी धडपडत आहेत. लोकसभेच्या जास्त जागा असणार्‍या काही मोजक्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला २६ जागा लढवून केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या, तर राष्ट्रवादीला २१ जागा लढवून चार जागा जिंकता आल्या होत्या.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुढीपाडवा निमित्ताने राज ठाकरेंची सभा; सेनाभवना समोरील बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा

Aprna

लखनऊमध्ये प्रियांका गांधींचा दुर्गा अवतार

News Desk

राष्ट्रवादीच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

News Desk