HW News Marathi
राजकारण

कॉंग्रेसने कधीही भगवा दहशतवाद असे म्हटले नाही | पीएल पुनिया

नवी दिल्ली | मक्का मज्जिद च्या निकालानंतर भाजपच्या रडावर असलेल्या कॉंग्रेस कडून स्पष्ट करण्यात आले की भगवा दहशतवाद अशी कोणतीही गोष्ट नाही. कॉंग्रेस चे प्रवक्ते पीएल. पुनिया म्हणाले, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व कॉंग्रेस पक्षाकडून कधीही भगवा दहशतवाद अशा प्रकारच्या शब्दाची वाच्चता झालेली नाही.

भाजप पक्ष विनाकारण कॉंग्रेसला टिकेच लक्ष करत आहे. त्यांच्याकडे यासंदर्भात कोणतेही पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावेत. त्यामुळे भाजपच्या कोणत्याही टिकेला उत्तर देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही.

भगवा दहशतवाद संदर्भात बोलताना तात्कालीन संयुक्त सचिव आरबीएस मणी म्हणाले, हिंदू आतकंवादा संदर्भात गुन्हेगारांवर असलेले सर्व आरोप खोटे आहेत. यावर पुनिया म्हणाले, मणी यांच्या विधानाकडे लक्ष दिले तर रेकॉर्ड मध्ये कुठे भगवा आतंक असा उल्लेख आढळलेला नाही. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आतकंवादी असा कोणताही धर्म किंवा समुदाय नसतो. ही मानसिकता कींवा प्रवृत्ती असते. याला कोणत्याही धर्म किंवा समाजाशी जोडणे चुकीचे आहे असेही पुनिया या निकालानंतर बोलताना म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ ईडीच्या कार्यालयाबाहेर थांबणार

News Desk

लोकांनी विरोधात बसण्याची संधी दिली, सक्षम विरोधकांची भूमिका पार पाडू !

News Desk

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत दहाव्या फेरीपर्यंत ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर

Aprna