HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

सत्तेत आल्यानंतर एका वर्षात देशातील २२ लाख युवकांना सरकारी नोकऱ्या देणार | काँग्रेस

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांकडून विविध घोषणांना देण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी देशातील युवकांना रोजगार देण्यास अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत केला आहे. राहुल यांनी पुढे म्हटले की, जर काँग्रेसचे सरकार आले तर ३१ मार्च २०२० पर्यंत २२ लाख युवकांना सरकारी नोकरी देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

काँग्रेस लकरच जाहीरनाम्याची घोषणा करणार आहे. यामध्ये ‘न्याय’ (NYAY)योजनेनंतर शहरी रोजगार गॅरेंटी योजनेची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. या योजने अंतर्गत किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये ४ ते १० हजार रुपये महिना उत्त्पन्न मिळणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणाही काँग्रेसकडून होण्याची शक्यता आहे.

२०१९ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास देशातील २० टक्के गरीब कुटुंबांना दरवर्षी ७२ हजार रुपये देणार, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे. या योजनेता थेट फायदा देशातील ५ कोटी कुटुंबांना म्हणजेच २५ कोटी जनतेला या योजनेचा लाभ होण्याचा दावा काँग्रेसने  केला आहे.

 

Related posts

विधानपरिषद सदस्य आणि महामंडळ अध्यक्षपदांची रिपाइंची मागणी

News Desk

आधी भाजपने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांसाठी केलेल्या खर्चाचा तपशील द्यावा !

News Desk

शास्त्रीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रशासनाची अपुरी मदत

News Desk