HW News Marathi
राजकारण

काँग्रेसने आमदारांच्या फोडाफोडीचे आरोप पुराव्यासहित सिद्ध करावेत !

मुंबई | “भाजप कोणत्याही आमदारांच्या संपर्कात नाही. कोणत्याही प्रकारे आमदारांची खरेदी-विक्री केली जात नाही. काँग्रेस नेत्यांनी आमच्यावर केलेले आमदारांच्या फोडाफोडीचे आरोप पुराव्यासहित सिद्ध करावेत. नाहीतर महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी”, असे आव्हान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. आज (८ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमदार फोडण्यासंदर्भात भाजपवर गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोप फेटाळून लावत आता सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला हे आव्हान दिले आहे.

“राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी कोणाच्याही आमदारांना फोडणार नाही. भाजपने असे राजकारण कधीही केलेले नाही. आम्हाला कोणाचेही आमदार फोडण्याची गरज वाटत नाही. भाजपकडून कोणत्याही प्रकारे आमदारांची खरेदी-विक्री केली जात नाही. काँग्रेस नेत्यांनी आमच्यावर केलेले आमदारांच्या फोडाफोडीचे आरोप पुराव्यासहित सिद्ध करावेत. ते जर आपले आरोप सिद्ध करू शकले नाहीत. तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. काँग्रेसकडून स्वतःच्याच आमदारांवर अविश्वास दाखवला जात आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याच आमदारांची माफी मागावी”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांच्या छातीवर गोळ्या झाडणं गैरच- रावसाहेब दानवे

News Desk

#KnowYourNeta | जाणून घ्या…नागपूर मतदारसंघाबाबत !

News Desk

आज विधानसभा निवडणुकीची होणार घोषणा, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

News Desk