HW News Marathi
राजकारण

शेगावत होणाऱ्या सभेत सोनिया गांधी उपस्थित राहणार; उद्धव ठाकरे हजेरी लावणार?

मुंबई | काँग्रेसच्या (Congress)भारत जोडो यात्रेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसच्या भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेचा देशात 70 वा दिवस तर महाराष्ट्रात आज (16 नोव्हेंबर) 10 वा दिवस आहे. राज्यातील यात्रा ही शेगाव रोजी होणार असून ही सभा 18 नोव्हेंबर रोजी शेगाव होईल. या सभेसाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) येणार आहे. तर यासभेत शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निमंत्रण दिल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले आहे. आता उद्धव ठाकरे येणार का?,  याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

महाविकास आघाडी स्थापन होऊन तब्बल तीन वर्ष झाले आहेत. शेगावच्या सभेत सोनिया गांधी हजेरी लावणार आहे. तर कदाचित शेगावच्या सभेत महाविकास आघाडीच्या मोठे नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात उद्धव ठाकरे हे शेगावच्या सभेत हजेरी लावणार असल्याची माहिती माध्यमातून येते आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा शेगावच्या सभेचे निमंत्रण दिले आहे. यामुळे आता यासभेत महाविकासआघाडीचे मोठे नेते येणार का?, यासभेच सर्वांना स्पष्ट होईल.

नुकतेच यात्रा हिंगोलीत दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड नेते सहभागी झाले होते.

 

Related posts

आधी माझ्या शेतकऱ्यांचे काय करता ते बोला !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीशी संबंधित नसलेले विषय लोकांसमोर मांडतात

News Desk

वेळ पडली तर रेल्वेने पाणी आणू | महादेव जानकर

News Desk