कडेगाव :पोटनिवडणुकीसाठी पलूस-कडेगाव विधानसभाच्या जागेवर काँगेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ . विश्वजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी त्यांचे सुपुत्र डॉ. विश्वजीत कदम यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी मुख्यमंत्री पृथीराज चव्हाण, माजी मंत्री आमदार सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार निरंजन डावखरे, खानापूर-आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, विजयमाला कदम, स्वप्नाली विश्वजीत कदम उपस्थित होते.
कडेगावच्या उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला पाठींबा दिला असल्यामुळे भाजप या पोटनिवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी देणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.