HW Marathi
राजकारण

काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचा अनोख्या पद्धतीने निषेध

नवी दिल्ली | वाराणसी येथे आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे.काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार अजय राय यांच्या नेतृत्त्वाखाली वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अर्थमंत्री अरुण जेटली आणि आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे फोटो ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या सिनेमाच्या पोस्टरमध्ये दाखवले आहेत.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र मोदींच्या नोटबंदीच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणावर निषेध होताना दिसत आहे. एकीकडे भाजपकडून नोटबंदीचे फायदे शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून नोटबंदीचा निर्णय कसा फसला आहे हे दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे. याचसाठी काँग्रेसकडून आज हे आंदोलन करून या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

Related posts

काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या युवासेना कार्यकर्त्यांची हकालपट्टी

News Desk

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज

अपर्णा गोतपागर

‘आई-वडील हे साक्षात परमेश्वर तर प्रत्येक स्त्री ही साक्षात लक्ष्मी आहे’ | राम कदम

News Desk