HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

चिंताजनक ! राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे १२ नवे रुग्ण

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत तासागणिक होणारी वाढ हा आता मोठा चिंतेचा विषय बनला आहे. केवळ आजच्या (२१ मार्च) एका दिवसात राज्यात १२ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६४ इतकी झाली आहे. तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडाही ३०१ वर जाऊन पोहोचला आहे. इतकेच नव्हे तर राज्यतील सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. एका दिवसांत रुग्णांच्या संख्येत झालेली ही लक्षणीय वाढ अत्यंत चिंताजनक आहे. राज्यातील या १२ नव्या रुग्णांपैकी ८ जण मुंबई, २ जण पुणे तर यवतमाळ, कल्याणमधील प्रत्येक २ कोरोनाचे रुग्ण आहे.

मुंबईत आता कोरोनाबाधितांचा आकडा १९ वर जाऊन पोहोचला आहे. तर राज्यातील इतर शहरांमध्ये म्हणजे पुण्यात ११, पिंपरी चिंचवडमध्ये १२, नागपूर, यवतमाळ, कल्याणमध्ये प्रत्येकी ४, नवी मुंबईत ३, त्याचप्रमाणे अहमदनगरमध्ये २, आणि पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरीत कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण सापडल्याची माहिती आहे. दरम्यान, देशात वाढलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या (२२ मार्च) म्हणजेच रविवारी संपूर्ण देशात सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधानाच्या या निर्णयाला सामान्य नागरिक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Related posts

आता ईडीकडून नितीन सरदेसाईंची देखील चौकशी होणार

News Desk

शिवसेना-भाजपची युती तुटणार ?

News Desk

मध्यप्रदेशात एस्मा कायदा लागू, मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दिली माहिती

News Desk