HW News Marathi
राजकारण

देश धनवान मात्र जनता गरीब, हेच आपल्या देशाचे खरे चित्र !

मुंबई | आपल्या देशाचे खरे चित्र म्हणजे देश धनवान आणि देशाची जनता गरीब असे आहे, असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये ‘द आयडिया ऑफ न्यू इंडिया’ (नव्या भारताची संकल्पना) या विषयावर व्याख्यान देण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

आपल्या भारतात विचारधीनतेपेक्षा विचार शून्यांची संख्या मोठी आहे. जर आपल्या सुपरफास्ट व्हायचे असेल तर आपल्या देशातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींने पुढील ५० वर्षांसाठीचे व्हिजन तयार ठेवणे गरजेचे आहे, असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी गडकरी भारताच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक विषयांवर आपले मत मांडले आहे.

नितीन गडकरी यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे :

– राष्ट्रीय महामार्ग वाढविण्याचे कामे हाती घेतली असून सध्या तब्बल ७ लाख कोटींची कामे महाराष्ट्रात सुरू आहेत.

– मुंबई-दिल्लीमध्ये १४ लेन महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग मुंबईपेक्षा देखील मोठा असणार आहे. दिल्ली ते जयपूर १ लाख कोटी रुपये खर्च करुन हा महामार्ग अडीच वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच दिल्ली ते मेरठ हायवे बांधण्यात येणार असून या मार्गामुळे ४० तासाचा प्रवास ४० मिनिटांमध्ये पार करता येणार आहे.

– मानस सरोवराला जाण्यासाठी चीन व नेपाळपासून जावे लागते. मात्र आता उत्तराखंडामध्ये हिचरा येथून सरळ मानस सरोवरला जाता यावे यासाठी काम सुरु असून ते काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. आता बद्रीनाथ केदारनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही बाराही महिने जाऊ शकता. या कामात काही अडचणी आल्या नाहीत तर हा मार्ग जूनपर्यंत पूर्ण होईल.

– देशातील १७ ठिकाणी आम्ही एअरपोर्ट रोड बांधण्याचे काम सुरू आहे.

– मुंबई ते गोवा हा महामार्ग ऑगस्टमध्ये पूर्ण करण्यात येईल. ज्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढते. त्याप्रमाणात एक लेन सुरू करण्यासाठी करोडो रुपये लागतात.

– वाराणसी ते अलाहाबाद जलमार्गाने काम कुंभमेळ्याच्या आधी करण्यात येणार आहेत. अलाहाबादला १५० करोड लोक येणार आहेत. कुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी रिव्हर बोटद्वारे वाराणसी ते अलाहाबादला जाऊन गंगेत स्नान करून येऊ शकतात. हे काम जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहेत.

– मुंबईमध्ये नवीन क्रुझ टर्मिनज बांधण्यात येणार आहेत. यामुळे अडीज लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. ठाणे ते विरार १२ कोटी रुपये देण्यात येणार आहे. जेणेकरून जलमार्गाने काम सुरू करता येईल.

– मुंबईच्या विकासाठी जलमार्गावर भर देण्यात येणार आहे. सागरमाला प्रकल्प हा १६ लाख कोटींचा प्रकल्प बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सव्वा लाख लोकांना रोजगार मिळेल.

– नागपूरच्या मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर ई-सायकल, रिक्षा, टॅक्सी या सोयी देण्यात येणार आहे. १० हजार कोटी इथेनॉल आपण तयार करणार आहेत. इथेनॉल हे कोळशापासून तयार करतात. आपण इथेनॉलपासून देशाची अर्थव्यवस्था बदलू शकतो. इथेनॉल, मिथेनॉलवर बस, दुचाकी, ई रिक्षा होणार आहे. त्यामुळे देशातील प्रदुषण कमी होणार आहे.

– गंगेला शुद्ध करण्यासाठी २५० घाट बांघण्यात येणार आहेत. मार्च अखेरपर्यंत गंगा ८०% ते ९०% शुद्ध करण्यात येणार आहे. मुंबईतील समुद्र आणि मिठी नदी सुंदर-शुद्ध करणे अवघड आहे पण अशक्य नाही. मुंबईतील समुद्र आणि मीठी नदीसाठी मुंबईकरांनाच आंदोलन करावे लागणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छिंदम मारहाण प्रकरणी सेनेच्या नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल

News Desk

उद्धव ठाकरेंचे भाषण समजावून सांगणाऱ्याला मनसेकडून बक्षीस जाहीर

News Desk

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य

News Desk