HW News Marathi
राजकारण

शाईफेकीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | “सध्या महाराष्ट्रात झुंडशाही सुरू आहे. ही झुंडशाही राज्य सरकार सहन करणार नाही”, अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी चिंचवडमध्ये शाई फेक हल्ल्यानंतर दिली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड शाई फेकून हल्ला करण्याची घटना घडली आहे. चंद्रकांत पाटील हे चिंचवड येथील मोरय गावासी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्धघाटनासाठी आज (10 डिसेंबर) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आले असताना त्यांच्यावर  शाईफेक झाली.

 

त्यावेळी चंद्रकांत पाटील हे भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरी चहापाण्यासाठी थांबले होते. तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर  शाईफेकला प्रकार घडला. चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (9 डिसेंबर) पैठणमधील एका कार्यक्रमदरम्यान “आंबेडकर-फुले या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली”, असे वादग्रस्त केले होते. या प्रकरणी चंद्रकांत पाटालांनी आज (10 डिसेंबर) माध्यमांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

 शाईफेक हल्ल्यानंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

 

शाईफेकल्यानंतर चंद्रकांत पाटलांवर माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मी चळवळीतला माणूस असून मी कुणालाही घाबरत नाही. मी आंबेडकर-फुले यांच्या केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही हा हल्ला झाला. या गोष्टींमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तडा देतो. विरोध हा लोकशाहीच्या मार्गाने करायाचा. सध्या महाराष्ट्रात झुंडशाही सुरू आहे. ही झुंडशाही राज्य सरकार सहन करणार नाही.”
चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले

चंद्रकांत पाटील म्हणाले, “चांगल्या कामाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मिळून गेलो. तर पैशाला अडचण येणार नाही. इमारतीचे जे पूर्णकरण आहे. ते ताबडतोप ते जिल्हा नियोजन निधीमधून देत आहेत. माझे म्हणणे आहे की, त्या व्यतिरिक्त खरे तर आज दिवसभरात मी ठिकठिकाणी विषय मांडणार आहे. सरकारवर अवलंबून का राहत आहात. या देशामध्ये शाळा कोणी सुरु केल्या. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय पैसे त्या. आता त्या काळामध्ये 10 रुपये देणार होते. आता 10, 10 कोटी रुपये देणारे लोक आहेत. आता अशा सगळ्यानी ज्याला आपण सीएसआर म्हणतो.”

संबंधित बातम्या

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात १३ राज्यांत ९७ जागांसाठी आज होणार मतदान

News Desk

राज्यातील हे ‘स्थगिती सरकार’ फार काळ टिकणार नाही !

News Desk

“ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत, त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले पाहिजे”, उद्धव ठाकरेंची मागणी

Aprna