HW News Marathi
राजकारण

“सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

मुंबई | “सध्या महाराष्ट्रात एक अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार आहे. यामुळेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यातील 40 गावांचा त्यांच्या राज्यात समावेश करण्याचा दावा केला आहे”, असा आरोप शिंदे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. राऊतांनी आज (23 बुधवारी) माध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी केलेल्या वक्तव्यावर हल्ला बोल केला आहे.

 

राऊत म्हणाले, “सध्याचे राज्य सरकार हे एक अत्यंक कमजोर आणि हतबल सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सीमा प्रश्नाला कोणीच वाचा फोडली ?, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांशी चर्चा करणार, असेही त्यांनी जाहीर केले असून आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीमधील जत तालुक्यातील 40 गावांना त्यांच्या राज्यात सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली मिंदे सरकार आहे. कोणाला मुंबई तर कोणाला महाराष्ट्र तोडायचा आहे. आता मुख्यमंत्री चाळीस आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले. देशातील अनेक राजकीय दरोडेखोरांना असे वाटते, महाराष्ट्राचे लचके तोडू शकतात,” असे ते म्हणाले.

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले

नुकतेच सांगलीतील जत तालुक्यातमधील 40 दुष्काळग्रस्त गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. यानंतर कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील गावांना आपल्या राज्यात आणण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे.  या पार्श्वभूमीवर बसवराज बोम्मई म्हणाले, “सांगलीतील जत तालुका दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई असते. या गावांना पाणी देऊन आम्ही मदत केली आहे. या तालुक्यातील 40 गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. या गावांनी केलेला ठरावाचा आम्ही गंभीरपणे विचार करत असून सीमा विकास प्राधिकरणाद्वारे आम्ही महाराष्ट्रातील कन्नड शाळांना अनुदान देणार आहोत.”

 

 

Related posts

बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करणार !

News Desk

विश्वजित कदम यांनी फेटाळल्या भाजप प्रवेशाच्या चर्चा

News Desk

जावेद हबीब यांचा भाजप प्रवेश, मोदींसह दिग्गजांना नेटकऱ्यांनी दिला नवा लूक

News Desk