HW News Marathi
राजकारण

साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचा आज होणार फैसला

नवी दिल्ली | सातारा लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभा निवडणुकीसोबतच घ्यावी, या अटीवर साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केले होता. मात्र, विधानसभा निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयोगाने सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा उल्लेख केला नाही. आता सातारा लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात आज (२३ सप्टेंबर) दुपारी १ वाजताच्या सुमारास अधिसूचना निघणार असून अखेर उदयनराजेंच्या अट मान्य केले आहे.

विधानसभेसोबत लोकसभेची पोट निवडणूक होणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध उदयनराजे असा सामना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी विधानसभा निवडणुकांबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होऊन, त्यात विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाचा लाभ होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या साताऱ्यातील उदयनराजे समर्थकांच्या हाती निराशा आली होती. मात्र, आज निघणाऱ्या अधिसूचनेने उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये आनंदचे वातावरण पाहयला मिळेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री इतके तटस्थ आणि स्थितप्रज्ञ कसे काय राहू शकतात?

swarit

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ?

News Desk

“महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू”, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर लोकसभेत खडाजंगी

Aprna