HW News Marathi
राजकारण

बदनामीकारक वक्तव्य केल्याने अण्णा हजारेंची नवाब मलिक यांना नोटीस

पुणे | “अण्णा हजारे हे संघाचे एजंट आहे. ते पैसे घेऊन उपोषण करतात”, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर अण्णा हजारेंच्या समर्थकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अण्णा हजारेंनी बदनामी आणि फौजदारी कारवाईची कायदेशीर नोटीस देखील नवाब मलिक यांना पाठविली आहे.

नवाब मलिक यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान नवाब मलिक यांनी स्वतः मात्र यावर मौन पाळले आहे. “नवाब मलिक यांच्या त्या वक्तव्याशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. मलिक यांच्या वक्तव्यामुळे अण्णा हजारे दुखावले गेले आहेत. यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो” असे अजित पवार म्हणाले.

अण्णा हजारेंनी पाठविलेल्या नोटिशीत काय म्हटले आहे ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे यांच्या विषयी ‘अण्णा हजारे हे संघ परिवारा कडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकिलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात’ अशी बदनामी कारक व पूर्णपणे खोटी वक्तव्ये एका वृत्त चित्रवाहिनीवर चर्चा करताना केली. त्यानंतर १ फेब्रुवारी २००९ रोजी तातडीने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबडतोब नवाब यांनी केलेल्या बदनामीकारक वक्तव्यांची अण्णा हजारे यांची माफी मागून दिलगीरी व्यक्त केली होती. मात्र, अद्याप स्वत: नवाब मलिक यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्या विषयी कुठलाही खुलासा केलेला नाही.

नवाब मलिक यांच्याकडे कोणताही पुरावा नसताना त्यांनी हे वक्तव्य केले. फक्त राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक अण्णा हजारेंची बदनामी तसेच्या समाजात वाईट समज निर्माण करण्याच्या उद्देशाने मलिक यांनी हे वक्तव्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माझा भाऊ तुम्हाला कधीही निराश करणार नाही, त्याची काळजी घ्या !

News Desk

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला निषेध नोंदवावा! – अजित पवार

Aprna

मोदींना पाठिंबा मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना विरोध । नारायण राणे

News Desk