HW Marathi
राजकारण

बिग बॉस फेम सपना चौधरीचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि बिग बॉस फेम सपना चौधरी हिने शनिवारी (२३ मार्च) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सपना उत्तर प्रदेश काँग्रेसकमिटीचे संघटक नरेंद्र राठी यांच्या उपस्थितीत दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.  सपनाला मथुरा लोकसभा मतदार संघातून हेमा मालिनी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, काँग्रेसने मथुरामधून महेश पाठक यांना उमेदवारी दिल्याने चौधरीच्या चर्चांवर आता पूर्णविराम लागला आहे.

काँग्रेस प्रवेशापूर्वी सपना चौधरीने ‘युपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. तसेच काँग्रेससाठी निवडणुकीचा प्रचार करण्याचे ठरवले होते. त्यानंतर शनिवारी सपनाने प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. सपना हरियाणा व्यतिरिक्त इतर राज्यांत देखील प्रसिद्ध आहे.  सपनाने तिच्या डान्सने लाखो चाहत्‍यांना वेड लावले आहे. त्‍याचप्रमाणे सपानाची जादू राजकारणात देखील चालणरा का हे पाहण्यासाठी तिचे चहाते उत्‍सुक आहे.

 

Related posts

धर्मा पाटील यांचा मृत्यू ही सरकारी हत्या | खा. अशोक चव्हाण

News Desk

‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात!

News Desk

आजपासून तीन दिवस बॅंका बंद असणार

rasika shinde