आरती मोरे । निवडणुका म्हटल्या की, प्रचारी आलाच यात महत्त्वाचे असते ते म्हणजे झालेल्या आणि होणारा विकास या संबंधित उमेदवार त्यांच्या आश्वासने देता. परंतु सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या उमेदवारांच्या प्रचारापेक्षा अपप्रचार यावर सर्वाधिक भर दिला जात असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर तर शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या मिशा यातच सध्या प्रचार फिरू लागल्याने स्वाभाविकच निवडणुका नक्की कशासाठी आहेत ? असा सवाल साताऱ्यातील प्रत्येक मतदारांच्या मनात येत असेल.
लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने देशपातळीवरील मुद्द्यांना सर्वाधिक महत्त्व देणे हे क्रमप्राप्त आहे. त्यात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार कामगार, व्यापारी सार्वत्रिक मुख्य घटकांवर आधारित अशी पक्ष उमेदवारांची ध्येय धोरणे अपेक्षित असतात. सत्ताधाऱ्यांनी आपण काय केले, भविष्यात काय करणार आणि विरोधकांनी आपल्याला सत्ता दिली तर ते मतदारांसाठी काय करणार आता जाहीर करणे जास्त गरजेचे असतात .
सध्या या मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले व नरेंद्र पाटील या दोन मातब्बर नेत्यांमध्ये खरी लढत आहे. यात नरेंद्र पाटील यांच्यासोबत समितीच्या माध्यमातून राज्यात आणि देशातील शासनाचे कामे, तर मधल्या काळात राष्ट्रवादीच्या सहाय्याने मिळालेले विधान परिषद आमदार पद आणि त्या माध्यमातून केलेले काम आहे. तर दुसऱ्याबाजुला खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी गेल्या दहा वर्षातील खासदारकीचा अनुभव ,जिल्ह्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या व्यासपीठ तर कमालीची तरुणाईची क्रेझ लोकप्रिय भांडवल आहे.
दोन्ही बाजूने काही सकारात्मक तर काही नकारात्मक बाजू असल्या तरी प्रचारात मात्र या मुद्द्यापेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांचे डायलॉग आणि त्यांची काॅलर उडवण्याची स्टाईल याचा प्रचार सुरू आहे. त्याचवेळी कॉलर उडवून दहशत करून मते मिळत नसल्याचा दावा विरोध करतात तर दुसरीकडे नरेंद्र पाटील यांच्या माथाडी नेते स्टाईल मिशा यांची तुलना थेट माजी खासदार व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्य कार्यशैलीशी करण्यात येत आहे. मिशीवाला खासदारांचा सर्व सामान्यांना न्याय देऊ शकेल याचे १९९९ ते २००९ या कालावधीतील दाखले दिले जात आहेत.
या सगळ्यांमध्ये सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे हे उमेदवारच नव्हे. तर मतदारही विसरल्याचे चित्रे काही प्रमाणात पाहायला मिळत आहेत. राजांच्या काॅलरची क्रेझ फक्त तरुणाईतच आहे असे नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा स्वतःच्या हाताने उदयनराजेंच्या काॅलर उडवल्याचे जगाने पाहिले. त्यामुळे यंदाची सातारच्या लोकसभा निवडणूक फक्त गाणी, डायलाॅग , मिशा यांपुरती मर्यादित राहणार की खरचे सामान्य जनतेच्या विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक होणार ? हे लवकरच कळेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.