HW Marathi
राजकारण

राज्यातील जनतेची निराशा करणारे अधिवेशन-धनंजय मुंडे

सरकार विरूध्दचा संघर्ष रस्त्यावर कायम ठेवण्याचा निर्धार

मुंबई .अर्थसंकल्पीय अधिवेशनातुन राज्यातील कोणत्याही घटकाला काहीही मिळाले नाही. त्यामुळे हे अधिवेशनही राज्यातील जनतेची निराशा करणारे ठरले असल्याची प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त्त केली आहे. जनता विरोधी आणि भ्रष्ट सरकार विरूध्दचा आमचा संघर्ष रस्त्यावरही कायम ठेवु असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीनंतर पत्रकारांशी संवाद साधतांना श्री.मुंडे म्हणाले की, अर्थसंकल्पातुन शेतकऱ्यांना काही मिळाले नाही, बेरोजगार, सर्व सामान्य नागरिक, महिला, विविध खात्यातील कर्मचारी, शिक्षक कंत्राटी कर्मचारी अंगणवाडी माता भगिणी, एस.टी कर्मचारी अशा कोणत्याही घटकाला सरकारने काहीही दिलेले नाही. भ्रष्ट मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रथा आणि परंपरे प्रमाणे क्लिनचिट मात्र दिल्याचा टोला त्यांनी लगावला.

हे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरल्याचे आम्ही सभागृहात मांडले. राज्यपालांचा सरकार वरचा अविश्वास त्यांनी दिलेल्या निर्देशातील नाराजीतुन स्पष्ट दिसला आहे. कृषी क्षेत्राची आणि विकास दराची झालेली घसरण, आर्थिक पाहणी अहवालातुन स्पष्ट झाली आहे. प्रचंड तुटीच्या अर्थसंकल्पातुन राज्य कर्जबाजारी झाल्याचेही दिसुन आले आहे आणि आम्ही हे सभागृहात सिध्द करुन दाखवले. डांगोरा पिटुनही संपुर्ण कर्ज माफी  करण्यात सरकारला यश आले नाही.  बोडअळीची नुकसान भरपाई नाही, गारपीटीची नुकसान भरपाई नाही, धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतरही त्यांच्या कुटुंबियांना साधा न्याय देता आला नाही, भिमा कोरेगांव प्रकरणी आरोपींना सरकार अभय देत असल्याचे सिध्द झाले आहे. मेकइन महाराष्ट्रा, चुंबकीय महाराष्ट्रा, मॅगनेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातुन दिशाभुल कशी होत आहे हे आम्ही आकडेवारीनिशी दाखवुन दिले.

तुर आणि कडधान्याच्या खरेदीत सरकार अपयशी ठरले. मराठा, धनगर, मुस्लिम आणि लिंगायत आरक्षणावर सरकारची नकारार्थी भुमिका पुन्हा एकदा दिसुन आली. शिक्षक, अंगणवाडी शिक्षीका, कंत्राटी कर्मचारी, एस.टी. कर्मचारी यासह समाजातील विविध घटकांनी अधिवेशन काळात आंदोलने केली. त्यांचे प्रश्न आम्ही सभागृहात हिरीरीने मांडले तरीही सरकार त्यांना न्याय देऊ शकले नाही.

मी माझ्या शेवटच्या भाषणात सांगितले होते की, कोशीश करणे वालो की कभी हार नही होती. सभागृहातुन जनतेला न्याय मिळाला नसला तरी ठिक आहे. आमचा संघर्ष मात्र संपलेला नाही. रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आम्ही मोकले आहोत. येत्या 2 तारखे पासुन पुन्हा हल्लाबोल यात्रा सुरू करू आणि कुंभकरणाच्या झापेत असलेल्या या सरकारला खडबडुन जागे करण्यासाठी संघर्ष करु.
——————————————-

Related posts

मुलांपाठोपाठ वडिलांच्या ही हाती भाजपचा झेंडा

News Desk

तुमची बारामती कायमची बंद ठेवा, कोणाला फरक पडतो ?

News Desk

खासदार पाटील भाजपावर नाराज ?

News Desk