HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

येडं पेरलं अन् खुळं उगवलं, धनंजय मुंडेंची दानवेंवर जहरी टीका

मुंबई | विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. “बे एके बे…बे दुने चार…बे त्रिक बेअक्कल…यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष…येडं पेरलं आणि खुळं उगवलं’ अशी गत आहे सगळी.”, असे ट्विट करत धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

जालन्यात एके ठिकाणी भाषण करताना रावसाहेब दानवे यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा चक्क ‘हेलिकॉप्टरचा पायलट’ असा उल्लेख केला होता. दानवे यांच्या या भाषणातील कमांडर अभिनंदन यांच्या उल्लेखानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. धनंजय मुंडे यांनी देखील याच्यावरून रावसाहेब दानवेंची खिल्ली उडविली आहे.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे ?

“तुम्ही चॅनेलवर पाहिलं असेल कि पाकिस्तानी सैन्याने २४ तासाच्या आत अभिनंदनला भारतात आणून सोडला. अरे, एखाद्या आमची मोटारसायकल पकडली, ट्रिपल सीट धरलं तर सोडवून आणायला ४ दिवस लागतात. आणि आपण आपल्या हेलिकॉप्टरचा पायलट अवघ्या २४ तासांत सोडून आणला. या देशाला असा पंतप्रधान पाहिजे”, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले होते.

Related posts

हार्दिक पटेलला लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही ?

News Desk

पंकजा मुंडे घेणार सावरगावात दसरा मेळावा

News Desk

गांधी घराण्याबाहेरच्या कार्यकर्त्याला पक्षाचा अध्यक्ष करा !

News Desk