HW News Marathi
राजकारण

दीदी, तुम्ही दिलेली थप्पड माझ्यासाठी आशीर्वादच असेल !

नवी दिल्ली | “मला असे समजले कि ममता दीदींना मोदींना थप्पड मारायची आहे. ममता दीदी, मी तर तुम्हाला आदराने दीदी म्हणतो. तुम्ही दिलेली थप्पड देखील माझ्यासाठी आशीर्वादच असेल. मी ते सहन करेन”, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ममता बॅनर्जी या भाजप आणि विशेषतः पंतप्रधान मोदींविरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेत आहेत.

पंतप्रधान मोदींना तृणमूल काँग्रेस हा गुंडांचा पक्ष असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. “जेव्हा मोदी पश्चिम बंगालमध्ये येऊन म्हणतात कि तृणमूल काँग्रेस गुंडांचा पक्ष आहे. त्याचवेळी वाटते कि मोदींना जोरदार थप्पड ठेवून द्यावी. मोदींना त्याची गरज आहे. मी आजपर्यंत असा खोटारडा पंतप्रधान बघितला नाही. केवळ निवडणुका आल्या म्हणून त्यांना राम आठवण आहे”, अशी बोचरी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Aprna

आज संध्याकाळी एनडीएच्या नेत्यांची बैठक अन् डीनर पार्टी

News Desk

“महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जातात”, भुजबळांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

Aprna