HW Marathi
राजकारण

राष्ट्रवादीत शिरूर मतदारसंघावरून पेटला वाद, विलास लांडेंचे समर्थक आक्रमक

पिंपरी | राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. अमोल कोल्हे आणि विलास लांडे हे दोघेही शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या दोघांपैकी डाॅ. अमोल कोल्हे यांना तिकीट मिळण्याचे संकेत जास्त असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर विलास लांडे यांचे समर्थक आक्रमक झाले असून विलास लांडे यांना तिकीट मिळाले नाही तर पक्षाचे काम करणार नाही, अशी भूमिका विलास लांडे यांच्या समर्थकांनी घेतली आहे.

निवडणुकीच्या रिंगणात कोणता उमेदवार उतरवायचा, हा निर्णय पक्षांतर्गत घेतला जातो. शिरुर लोकसभेसाठी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने थेट जनतेकडूनच उमेदवार निवडण्याचा पर्याय अवलंबण्यात आला. या जाहीर मतदानात खासदारकीच्या उमेदवारीसाठी डॉ. अमोल कोल्हेंना भरघोस प्रतिसाद मिळाल्याची माहिती मिळत आहे. गुरुवारी (७ मार्च) मंचरमध्ये पार पडलेल्या या जाहीर संवाद यात्रेत अजित पवारांनी इच्छुक उमेदवारांसाठी थेट मतदानच घेतलं, यासाठी उपस्थितांना हात वर करण्याचं आवाहन केले गेले.

विलास लांडे, देवदत्त निकम, पोपटराव गावडे आणि अमोल कोल्हे अशा चौघांच्या नावाबाबत विचारणा झाली. त्यावेळी लांडे, निकम आणि गावडे यांना अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र अमोल कोल्हे यांचे नाव घेताच सभागृहात एकच जल्लोष झाला. दरम्यान, सभेत विलास लांडे यांच्या समर्थकांनी तिकीट मिळण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावरून अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांना सुनावले आहे. त्यामुळे आता शिरूर मतदारसंघासाठी कोणाला तिकीट मिळणार ?, राष्ट्रवादीकडून नेमका काय निर्णय घेतला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Related posts

#LokSabhaElections2019 : अखेर जालन्यातून अर्जुन खोतकरांची माघार

News Desk

EVMHacking : मी खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो !

News Desk

कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी पुन्हा कमळासमोरचे बटण दाबा !

News Desk