HW News Marathi
राजकारण

‘पवार साहेबांच्या गुप्‍त भेटीवेळी २००० साल का आठवलं नाही’

पवार साहेबांची गुप्त भेट घेताना 2000 साल का आठवलं नाही?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. ट्विटरवर त्यांनी यासंदर्भात ट्विट केलंय.

पुण्यात जागतिक मराठी अकादमी आणि BVG ग्रुप आयोजित शोध मराठी मनाचा या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दीर्घ मुलाखत घेतली. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक गोष्टीवर भाष्य करीत त्यांनी देशातील राजकारणाबरोबरच राज्यातील राजकारणावरही प्रतिक्रीया व्‍यक्‍त केली.

यावेळी त्‍यांनी बाळासाहेबांविषयी ही मत व्‍यक्‍त केले. यावर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले होते. बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा शिवसेना प्रमुखांबद्दलची आपुलकी कुठे गेली होती?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना केला होता.

यानंतर मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना टविट्‌रव्‍दारे लक्ष्य केले आहे. यामध्ये त्यांनी पवार साहेबांची गुप्त भेट घेताना २००० साल का आठवलं नाही?, असा सवाल उपस्‍थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वैचारिक वारसदार !

News Desk

राहुल गांधींनी घेतली दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा यांची भेट

News Desk

“पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले, तर…,” संजय राऊतांचे संकेत

Aprna