HW News Marathi
राजकारण

डॉ. आंबेडकरांचा पुतळा संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात उभारणार !

मुंबई | महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचा महासागर आहेत. अमेरिकेत लेहमन लायब्ररी मध्ये त्यांचा पुतळा असून त्या पुतळ्याखाली ज्ञानाचे प्रतीक म्हणून डॉ बाबासाहेबांचा गौरवाने उल्लेख करण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे महापुरुष विश्वरत्न ठरले आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात ज्ञानाचे महासागर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची भेट घेऊन भारत सरकारतर्फे प्रयत्न करणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

संयुक्त राष्ट्र संघात उभारण्यासाठीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा रिपब्लिकन पक्ष द्यायला तयार आहे. त्यासाठी आंबेडकरी जनतेकडून एक एक रुपया जमा करून पुतळा उभरण्याचा निधी सरकार ला देऊ या बाबत प्रधानमंत्र्यांशी बोलणार असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त रिपाइंतर्फे आयोजित जाहीर अभिवादन सभेत आठवले बोलत होते. यावेळी रिपाइं चे अनेक मान्यवर उपस्थित होते. सभेस प्रचंड मोठया प्रमाणात आंबेडकरी जनसमूह उपस्थित होता. दादर चैत्यभूमी जवळ च्या इंदूमिलची ३६०० कोटींची जमीन डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकास हस्तांतरित करण्यात आली असून तेथे सुरू असलेले स्मारकाचे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहे. त्या स्मारकाची उंची एक इंचही कमी होणार नाही असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भारतात पंचतीर्थ म्हणून नागपूर दीक्षाभूमी ;मुंबईत चैत्यभूमी ; दिल्लीतील २६ अलीपुर रोड येथील निर्वाणभूमी; मध्यप्रदेशातील महू येथील भीमजन्मभूमी या भीमस्मारकांचा विकास प्रधानमंत्री मोदींचे केंद्र सरकार करीत आहे. त्याचबरोबर लंडन मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत असताना वास्तव्य केलेल्या हेन्री रोडवरील निवासस्थानी स्मारकाचे काम करण्यात आले असून तेथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच अमेरिकेत जेथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्या कोलंबिया विद्यापीठात त्यांचा भव्य पूर्णकृती पुतळा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.त्या प्रयत्नांना भारत सरकारतर्फे मदत करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे सांगत संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचा निर्धार रामदास आठवलेंनी यावेळी व्यक्त केला.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान सर्वश्रेष्ठ असून ते कधीही बदलले जाणार नाही असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. मात्र तरीही विरोधक संविधान बदलले जाईल असा खोटा प्रचार करीत आहेत. संविधान कधीही बदलले जाणार नाही जर कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर हा पँथर रामदास आठवले त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही असा आक्रमक पवित्रा घेत जोशपूर्ण विचार रामदास आठवलेंनी यावेळी मांडले.

रिपब्लिकन गटांनी आपसात एकमेकांचा द्वेष करू नये. आपण रिपब्लिकन ऐक्यासाठी सदैव तयार आहोत. रिपब्लिकन ऐक्य झाले तर माझ्याप्रमाणे आणखी चार पाच नेते मंत्री बनतील. माझ्या वर कितीही टीका केली तर मी अन्य नेत्यांवर टीका करत नाही. मी हाती निळा झेंडा घेऊन आंबेडकरी विचारांचे काम करत आहे. दलितांच्या मतांवर नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनतात तर मी का मंत्री बनू नको. असा सवाल रामदास आठवलेंनी विरोधकांना केला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे जे खरे अनुयायी आहेत ते तोडण्याचा नाही तर जोडण्याचा विचार करतात. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सर्व जाती धर्माचे राजकीय पक्षांचे लोक मानू लागले; स्वीकारू लागले आहेत. त्यामुळे अन्य समाजघटकांना सोबत घेण्याचा जोडण्याचा विचार करा असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिरासाठी कायदा करा, सरसंघचालक भागवतांचे वक्तव्य

News Desk

निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि धनुष्यबाणावर होणार सुनावणी

Aprna

क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

Manasi Devkar