मुंबई | राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पाडुरंग फुंडकर यांचे निधन झाले. मृत्यू समयी ते ६७ वर्षांचे होते. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे गुरुवारी निधन झाले आहे. पहाटे सुमारे ४.३५ च्या दरम्यान फुंडकर यांची प्राण ज्योत मालवली. त्यांनी सोमय्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून फुंडकर हे आजारी होते, ते लवकर बरे होतील असे सर्वांना वाटत असताना त्यांच्या निधनाची आलेली बातमी सर्वांसाठी धक्कादायक ठरली.
राजकीय वर्तुळात शोककळा
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ट्विटरच्या माध्यमातून फुंडकरांना श्रद्धांजली वाहीली आहे. भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनामुळे धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मा. पांडुरंग फुंडकर शेतकरी नेते होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी ‘शत प्रतिशत भाजपा’ ही घोषणा केली होती.ही घोषणा प्रत्यक्षात आली असताना त्यांचे निधन होणे ही अत्यंत दुःखदायक घटना आहे.
भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनामुळे धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मा. पांडुरंग फुंडकर शेतकरी नेते होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी 'शत प्रतिशत भाजपा' ही घोषणा केली होती.ही घोषणा प्रत्यक्षात आली असताना त्यांचे निधन होणे ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. pic.twitter.com/fhwcXHOni2
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) May 31, 2018
भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने मी एक ज्येष्ठ सहकाऱ्याला आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे अशी प्रतिक्रीया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
अतिशय वाईट आणि धक्कादायक बातमी!
आमचे ज्येष्ठ नेते, माझे मंत्रिमंडळातील सहकारी, राज्याचे कृषीमंत्री श्री भाऊसाहेब फुंडकर यांचे आज निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकाऱ्याला आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे. शेती आणि सहकारातील प्रश्नांची जाण असलेला नेता आपण गमावला आहे.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 31, 2018
विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळल्या आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्त-मित्रांच्या, कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भाऊसाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 31, 2018
कृषिविषयक आणि सहकारक्षेत्रातील प्रश्नांची खरी जाण असणाऱ्या नेत्याला महाराष्ट्र मुकल्याची भावना सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी व्यक्त केली.
आमचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्या जाण्याने कृषिविषयक आणि सहकारक्षेत्रातील प्रश्नांची खरी जाण असणाऱ्या नेत्याला आपण मुकलो आहोत. आमचा प्रत्येक कार्यकर्ता आज दुःखात आहे. भाऊसाहेब यांना विनम्र श्रध्दांजली!
— Vinod Tawde (@TawdeVinod) May 31, 2018
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी, सहकार व ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी, सहकार व ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/Bg95Jxs8W1
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 31, 2018
महाराष्ट्रातील राजकारण, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे.भाजप राज्यात उभी करण्यात फुंडकर यांचे मोठे योगदान असलयाचे चंद्रकांत पाटील म्हणालेत.
आमचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब तथा पांडुरंगजी फुंडकर यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्रातील राजकारण, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रध्दांजली ! pic.twitter.com/cU63drOjCJ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 31, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.