HW News Marathi
राजकारण

अन् भाषणादरम्यान हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली

नवी दिल्ली | निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचे भाषण सुरु असतानाच एका अज्ञात व्यक्तीने चक्क त्यांच्या कानशिलात लगाविली आहे. प्रचारसभेत हार्दिक पटेल भाषण करत असताना एका अज्ञात व्यक्तीने चक्क व्यासपीठावर चढून हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लागाविली. तरुण गज्जर असे या व्यक्तीचे नाव असून ही व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. हार्दिक पटेल यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

गुजरातच्या सुरेंद्र नगरमधील प्रचारसभेत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले हार्दिक पटेल हे सध्या गुजरातमधील काँग्रेस नेत्यांचा प्रचार करीत आहेत. अशाच प्रकारची एक सभा ते सुरेंद्र नगर येथे घेत होते. यावेळी, तरुण गज्जर यांनी थेट व्यासपीठावर येत हार्दिक पटेल यांच्यावर हात उगारला. हार्दिक पटेल यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या व्यक्तीला आपल्या तब्येत घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत

News Desk

दुसऱ्या टप्प्यात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मतदान

News Desk

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू; नाशिकमध्ये कोण मारणार बाजी?

Aprna