HW News Marathi
राजकारण

अंबाजोगाईतील डीवायएसपींची बदली, तर ग्रामीणचे पीआय सस्पेंड; उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

बीड | बीड जिल्ह्यतील अंबाजोगाई तालुक्यात अवैध धंद्यांना कायदेशीर पोलीस संरक्षण देत हप्ते वसुली करणाऱ्या डीवायएसपी जायभाये यांची तातडीने बदली असून ग्रामीणचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (18 ऑगस्ट) सभागृहात केली. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी याबाबत आज (18 ऑगस्ट) लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणाची उपमुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवसंस्थेच्या प्रश्नावर नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडत प्रश्न उपस्थित केले होते. बीड जिल्ह्यातील धोक्यात आलेली कायदा-सुव्यवस्था आणि फोफावलेले अवैध धंदे या प्रश्नावर यापूर्वीच्या विधानसभा अधिवेशनात बरीच चर्चा झाली होती. त्यावरून तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा स्वामी यांची तडकाफडकी बदली देखील झाली होती.

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणे, त्यांना पाठीशी घालणे. या प्रकरणी झालेल्या चौकशीत संबधित पोलीस निरीक्षक दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याची तसेच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचीही अन्यत्र बदली करण्याची घोषणा फडणवीसांनी नुकतीच विधानसभेत केली. मुंदडांनी उपस्थित केलेल्या याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर संबधित पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नक्कीच पोलीस प्रशासनात आपले कर्तव्य व्यवस्थित न बजावणाऱ्या अधिकाऱ्यावर मात्र चांगलाच चपराक बसणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’त उर्मिला मातोंडकर सहभागी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

प्रवीण छेडा, डॉ. भारती पवार पुन्हा भाजपमध्ये

News Desk

वाढत्या महागाईमुळे आता पिशवीतून पैसे अन् खिशातून सामान आणावे लागेल !

News Desk